supreme-court 
देश

परिस्थितीमध्ये सुधारणा नाहीच;शेतकरी आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

पीटीआय

नवी दिल्ली - केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा अद्याप कायम असल्याने दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा वणवाही शमताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या आंदोलनावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर उघड नाराजी व्यक्त करताना परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचे म्हटले आहे. 

या कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा व्हावी हाच आमचा हेतू असल्याचे म्हटले आहे. आम्हाला परिस्थिती समजू शकते त्यामुळे आम्ही चर्चेला प्रोत्साहन देत आहोत, असे न्या. बोबडे यांनी नमूद केले. आजच्या सुनावणीदरम्यान ॲटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी आम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहोत. दोन्ही पक्षांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे असे सांगितले.

आज ट्रॅक्टर मोर्चाची रंगीत तालीम
शेतकरी संघटनांनी आज (ता.७) रोजी दिल्लीच्या चारही बाजूंनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. २६ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मुख्य मोर्चाची ही रंगीत तालीम असेल असे शेतकरी नेत्यांनी काल सांगितले. 

प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणाऱ्या मुख्य मोर्चाचे नेतृत्व हे पंजाब आणि हरियानातील अडीचशे महिला शेतकरी करणार आहेत. शेतकरी, सरकारमध्ये शुक्रवारी पुन्हा चर्चा होणार असून तिकरी सीमेवर शेतकऱ्यांनी पक्के बांधकाम करायला सुरवात केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या तंबूंचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे त्यांनी पक्के बांधकाम केले आहे.

नवे कृषी कायदे हे शेतकरीविरोधी असून आम्ही त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ.
- कॅ. अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री पंजाब

याचिकांवर एकत्रित सुनावणी
नव्या कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर एकत्रितरीत्या अकरा जानेवारी रोजी सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दर्शविली आहे. यातील एक याचिका ही दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित आहे. ॲड. एम.एल.शर्मा यांनी या नव्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT